Spam म्हणजे काय? What is Spam Meaning in Marathi

spam meaning in marathi आपण कधी ना कधी कुठे ना कुठे Spam बद्दल ऐकले असेल. कारण जसा Internet चा वापर वाढलाय त्याचबरोबर इंटरनेटवर या स्पॅम spam करणाऱ्या spammers ची संख्या देखील वाढली आहे, आणि ही spamming आपल्यासोबत देखील कधी ना कधी हमखास घडलेली असते.

किंवा कदाचित आपणच जाणूनबुजून किंवा नकळत ही spamming केली असेल. कारण त्याबद्दल आपणाला त्याबद्दल माहिती नसावी. चला तर मग पाहूया नक्की हा spamming विषय आहे तरी काय? spammers म्हणजे नक्की कोण? spammers meaning in marathi.

यासह या लेखात आपण स्पॅमचे प्रकार Types of spams आणि ते टाळण्याचे मार्ग how to be safe from spam पाहूया.

का Blockchain Technology सर्वाधिक सुरक्षित मानली जाते?

Spam Meaning in Marathi
Spam Meaning in Marathi

स्पॅम म्हणजे काय? What is Spam Meaning in Marathi

इंटरनेटवर प्रत्येक काम करण्यासाठी काही ठराविक वेगवेगळे नियम आहेत. परंतु या नियमांचे उल्लंघन करून केलेल्या कामाला spam म्हणतात.

तसे तर इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी स्पॅमिंग केले जात असते. परंतु सध्या, spamming हे मुख्यतः Email, Facebook, WhatsApp आणि YouTube इत्यादींवर मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

Spamming meaning in marathi चे काही प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतील.

फेसबुक स्पॅम Facebook Spam

जेव्हा एखादा Spammer त्याच्या एखाद्या product चा, website चा किंवा youtube video चा प्रचार करण्यासाठी facebook वर एक लिंक वारंवार publish करतो. किंवा तीच लिंक अनेक facebook groups मध्ये वारंवार share करतो, याला facebook spamming म्हटले जाते.

Webinar म्हणजे नक्की काय?

हे फेसबुकच्या algorithm च्या विरोधात आहे म्हणूनच facebook अशा व्यक्तीला spammer ठरवते आणि हे करणार्‍या व्यक्तीचे account फेसबुक काही दिवसांसाठी ban करते.

व्हॉट्सॲप स्पॅम WhatsApp Spam

फेसबुक प्रमाणेच, whatsapp वर देखील कोणत्याही गोष्टीच्या प्रमोशनसाठी किंवा एखादे उत्पादन विकण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून वारंवार link, video किंवा image शेअर करणे याला व्हॉट्सॲप स्पॅमिंग WhatsApp Spamming म्हटले जाते.

यूट्यूब स्पॅम YouTube Spam

Youtube वरती देखील अनेक प्रकारचे स्पॅमिंग होत असते. जर एखाद्या YouTube creator ने एकच video एकापेक्षा जास्त वेळा publish करणे तसेच व्हिडिओ चे title आणि व्हिडिओ मधील content एकमेकांपेक्षा भिन्न असेल तर हे spamming असते.

यासोबतच, वेगवेगळ्या व्हिडिओंच्या comment box मध्ये जाऊन वारंवार एकच कॉमेंट copy-paste करणे यालाही YouTube Spamming म्हणतात.

स्पॅम कॉल्स Spam Call meaning in marathi

Spam Call meaning in marathi बद्दल बोलायचे झाले तर हे देखील इतर spammers सारखेच असतात. यामध्ये आपणाला कोणतेही products किंवा services खरेदी करण्यास किंवा कोणत्याही सेवेत सामील होण्यास वारंवार कॉल करून प्रोत्साहित केले जाते किंवा सांगितले जाते. यालाच स्पॅम कॉल्स म्हटले जाते.

आपण Internet वरून एखादी service खरेदी केल्यास किंवा internet वर एखादी सेवा मिळवण्यासाठी आपला नंबर register केला असेल तर असे spam calls येत राहतात.

स्पॅम मेल spam mail meaning in marathi

जेव्हा आपल्या ईमेल आयडी email id वर Spammers आपल्या परवानगीशिवाय जाहिरात किंवा एखाद्या उत्पादनाच्या प्रमोशनचे मोठ्या संख्येने मेल पाठवतो. ज्याचा आपणाला काही उपयोग नसतो. असे mails हे spam mails म्हणून ओळखले जातात.

अशा स्पॅम मेल्सना electronic junk mail असेही म्हणतात. आणि हे मेल मुख्यतः आपल्या spam box मध्ये प्राप्त होतात.

spam mail image
Spam Meaning in Marathi

स्पॅम मेल कसा ओळखावा? How to Identify Spam Email?

वरती सांगितल्याप्रमाणे सर्वाधिक spamming हे email वर केले जाते. म्हणूनच या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ज्याद्वारे आपण आपल्या mail id वर येणारे spam mail सहज ओळखू शकतो आणि त्यामुळे होणारे पुढील नुकसान टाळता येऊ शकते.

• Spam mail हे मुख्यतः आपल्या Gmail च्या Spam Box मध्ये येत असतात.

• बहुतेक स्पॅम मेल हे मोठ्या कंपनीच्या नावावरून येतात. कारण स्पॅमर्सना माहित असते की यामुळे त्यांचे मेल पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढू शकते.

• त्यांचा mail address एखाद्या मोठ्या वेबसाइट किंवा कंपनीच्या नावासारखा professional असतो. उदाहरणार्थ, Flipkart ऐवजी Flipcart असा असू शकतो. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. कोणताही मेल उघडण्यापूर्वी त्याचा mail id नक्की तपासावा.

Spam meaning in marathi

Spam Mail पासून Spammers ना काय फायदा होतो?

स्पॅमिंगचा मुख्य उद्देश हा advertisement असतो. कोणत्याही product च्या जाहिरातीसाठी कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीद्वारे spamming केले जाते. ज्यामुळे त्यांचे product किंवा service सहज विकली जाते.

स्पॅमिंग हा अनेकांचा income source असतो. जसे की एक website आहे जी hosting विकण्याचे काम करते. आणि यासाठी ती दररोज 1000 लोकांना spam mail पाठवते. जर या 1000 लोकांपैकी 5% लोकांनी जरी त्यांची होस्टिंग घेतली तरी या website ला भरपूर उत्पन्न मिळेल.

स्पॅमर्सना मेल आयडी कसा कळतो? How Do Spammers Get Your Email Address

स्पॅमर्सना आपला e-mail address शोधण्यासाठी अनेक मार्ग ऊपलब्ध असतात. internet वरती अनेक tools उपलब्ध आहेत ज्यातून आपला ईमेल आयडी शोधता येतो.

इंटरनेटवर अनेक websites आहेत जिथे आपण आपले account तयार करतो. अनेक वेळा अशा वेबसाईट्स hack करून, आपला mail id तसेच इतर काही करून चोरला जातो किंवा काही websites आपला data परस्पर दुसऱ्या Spam करणाऱ्या कंपन्यांना विकत असतात.

how to block spam mail
Spam Meaning in Marathi

स्पॅम कसे टाळावे? How to Avoid Spam Messages/Mail/Calls

स्पॅममुळे आपली बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यापासून दूर राहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळता येऊ शकते. त्यामूळे spam टाळण्यासाठी काही टिप्स जाणून घेणे फायद्याचे ठरते.Spam meaning in marathi

• Spam mail पासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या email id वरील spam box मध्ये आलेले मेल न उघडणे.

• Spam folder मध्ये अधिक मेल येत असतील तर ते वेळोवेळी डिलीट करत राहणे.

• Email वर येणाऱ्या कोणत्याही website च्या link वरून shopping करू नये ज्यातून आपल्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता असते.

• Spam mail किंवा spam sms वर येणाऱ्या कोणत्याही bank link वर आपली personal information किंवा bank details कधीही टाकू नये. यामुळे आपले bank account हे hack होण्याचा धोका असतो.

• इंटरनेटवरील कोणत्याही वेबसाइटवर log in करताना password हा त्या browser मध्ये कधीही save करू नये.

• आपला personal email address सर्वत्र वापरू नये. त्यासाठी एक स्वतंत्र तात्पुरता email address तयार करून वापरता येऊ शकतो.

जर आपणाला स्पॅम म्हणजे काय? Spam Meaning in Marathi ही माहिती आवडली असेल किंवा यामुळे आपणाला कोणत्याही प्रकारे मदत झाली असेल तर ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून ते देखील spamming टाळू शकतील आणि या internet च्या युगात स्वतःची फसवणूक होण्यापासून वाचू शकतील. Thank You

Tags : spam meaning in marathi, spamming meaning in marathi, spam mhanje kay, स्पॅम म्हणजे काय? spam म्हणजे काय? spam in marathi meaning, स्पॅम अर्थ मराठी

2 thoughts on “Spam म्हणजे काय? What is Spam Meaning in Marathi”

  1. खूपच छान माहिती.
    लोकांना फसवणुकीपासून आपण सावध करीत असल्या बद्दल धन्यवाद.

    Reply

Leave a Comment