Webinar म्हणजे काय? What is Webinar Meaning in Marathi Language

webinar meaning in marathi गेल्या काही वर्षांत इंटरनेटवर वेबिनार Webinar हा प्रकार खूप पहिला जात आहे आणि आजकाल अनेक प्रकारचे Webinars देखील आयोजित केले जात आहेत. तरीपण वेबिनार म्हणजे काय webinar meaning in marathi हे अजूनही अनेकांना समजत नाही.

वेबिनारसंदर्भात आपणाला सहसा Social Media वर posts पाहायला मिळतात, ज्यात एखाद्या कंपनी किंवा व्यक्तीद्वारे एखाद्या विषयावर वेबिनार आयोजित करण्याविषयी माहिती दिली गेलेली असते. या व्यतिरिक्त, अनेक लहानमोठे businesses हल्ली त्यांचे वेबिनार आयोजित करताना दिसतात. Webinar हे business आणि marketing साठी खूप उपयुक्त ठरत असतात.

Block-Chain Technology म्हणजे काय?

बहुतांश लोकांसाठी Webinar हा एक नवीन शब्द आहे, ज्याबद्दल त्यांना जास्त माहिती नाही. तर जाणून घेऊया वेबिनार चा मराठी अर्थ किंवा वेबिनार म्हणजे काय? Webinar meaning in marathi language आणि Webinar software चे फायदे काय आहेत.

webinar meaning in marathi Webinar mhanje kay
What is Webinar Meaning in Marathi Language

वेबिनार म्हणजे काय? What is Webinar Meaning in Marathi Language

वेबिनार म्हणजे वेबवर म्हणजेच इंटरनेटवर होणारी एक ऑनलाईन meeting, presentation किंवा seminar असते. Webinar हा शब्द Web आणि Seminar या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.

Webinar म्हणजे एक प्रकारचा event जो इंटरनेटवर प्रसारित केला जातो आणि लोक तो इव्हेंट त्यांच्या smartphone, computer किंवा इतर device वरती पाहू शकतात.

शेअर मार्केटमध्ये सफल होण्यासाठी काही खास टिप्स.

शिक्षण, व्यवसाय किंवा इतर हेतूंसाठी वेबिनार आयोजित केले जाऊ शकते. जगात कुठेही बसलेले आयोजक म्हणजेच Host आणि प्रेक्षक एकमेकांशी जोडण्याचा Webinar हा एक मार्ग आहे.

याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेबिनार आयोजित करण्यासाठी कोणत्याही जागेची आवश्यकता नाही आणि प्रेक्षक कोणत्याही ठिकाणाहून त्यात सामील होऊ शकतात.

वेबिनार चे प्रकार Types of Webinars in Marathi

वेबिनार हे सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे असतात.

लाइव्ह वेबिनार Live Webinar

या प्रकारच्या वेबिनारमध्ये, Host हा इंटरनेट च्या माध्यमातून थेट प्रेक्षकांसमोर लाईव्ह येऊन वेबिनार करतो. यात प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे तिथल्या तिथे लाइव्ह दिली जातात. अशा प्रकारचा webinar हा online classes, business meetings, training इत्यादींसाठी ठेवण्यात येत असतो.

रेकॉर्ड केलेले वेबिनार Pre-recorded Webinar

जर आपणाला थेट live webinar करायचा नसेल, तर host आधीच video recorde करून वेबिनारमध्ये दाखवू शकतो. यामध्ये, एखादा video चांगल्या प्रकारे edit करून नंतर तो Webinar म्हणून दाखविता येतो.

What is Webinar Meaning in Marathi
What is Webinar Meaning in Marathi Language

वेबिनार कसे आयोजित करावे? How to Make Webinar

वेबिनार आयोजित करण्यासाठी आपणाला काही गोष्टींची आवश्यकता आहे.

  • इंटरनेट कनेक्टिव्हिटी
  • स्मार्टफोन किंवा संगणक, लॅपटॉप
  • Webinar Platform किंवा Software
  • Presentation Software (पर्यायी, आवश्यकतेनुसार)

कोणत्या विषयावर वेबिनार करायचे आहे, यासाठी host ने त्या विषयाची पूर्ण तयारी केलेली असावी. host ची इच्छा असल्यास, तो आधीच व्हिडिओ बनवू शकतो आणि वेबिनारमध्ये प्रदर्शित करू शकतो, यामध्ये content तयार करणे सोपे आहे, परंतु यामुळे श्रोत्यांना काही गैरसोय देखील होऊ शकते.

या व्यतिरिक्त, webinar आयोजित करण्यासाठी आपण अशा devices चा वापर केला पाहिजे, ज्यामध्ये camera आणि microphone चांगला असावा. तसेच, आपण अशा ठिकाणी बसायला हवे जिथे चांगली light असेल, जास्त आवाज नसेल आणि वेबिनार सुरू असताना कोणीही आपणाला disturb करू शकणार नाही.

गूगल संबंधीची ही तथ्ये आपणाला माहिती नसतील.

यासह, ज्यांना वेबिनारमध्ये सामील व्हायचे आहे, त्यांच्याकडे smartphone किंवा computer, laptop असावा, ज्यात internet connection सुविधा असावी आणि कोणतेही वेबिनार सॉफ्टवेअर देखील install केलेले असावे. आजकाल अनेक video conferencing apps किंवा softwares उपलब्ध आहेत, जे free मध्ये भरपूर सुविधा उपलब्ध करुन देतात.

Webinar Platform किंवा Webinar Software हे वेबिनार आयोजित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात, जे त्यांच्या technology मुळे online seminar अधिक सुलभ करत असतात.

Webinar Software द्वारे आपण अनेक प्रकारचे ऑनलाईन Seminar जसे की प्रेझेंटेशन presentation, ऑनलाईन क्लासेस online classes, मीटिंग्ज meetings, ट्रेनिंग training programs, प्रमोशन promotion इत्यादी आयोजित करू शकतो.

आजकाल अनेक webinar softwares, apps आणि ऑनलाईन platform उपलब्ध आहेत, त्यापैकी काही free उपलब्ध आहेत, तर काही paid अर्थात ठराविक मूल्य आकारून त्यांची service प्रदान करतात.

What is Webinar Meaning in Marathi Language
What is Webinar Meaning in Marathi Language

वेबिनार प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये Features of Webinar Platform

ज्याप्रमाणे ऑफलाइन इव्हेंटमध्ये प्रश्न उत्तरे चालतात, त्याचप्रमाणे प्रश्न विचारण्याची किंवा संदेश पाठवण्याची सुविधा webinar software मध्येही उपलब्ध असते. या व्यतिरिक्त, webinar platform मध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध असतात जी आयोजक आणि प्रेक्षकांना एक चांगला अनुभव देतात.

message व्यतिरिक्त, real time मध्ये बोलण्यासाठी voice chat चा option देखील असतो. ज्याद्वारे आपण थेट होस्टशी बोलू शकतो.

अनेक webinar platforms हे polls म्हणजेच मतदानाचा पर्याय देतात, ज्याचा उपयोग प्रेक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी किंवा सर्वेक्षणाच्या हेतूसाठी केला जाऊ शकतो.

आयोजकाला त्याच्या computer ची screen वेबिनारमध्ये दाखवण्याचा पर्याय दिलेला असतो ज्याद्वारे slide show द्वारे presentation करता येते. वेबिनार रेकॉर्ड केले जाऊ शकते आणि डिव्हाइसवर save केले जाऊ शकते.

सेमिनार आणि वेबिनार मधील फरक Difference between Seminar and Webinar in Marathi

Seminar आणि Webinar मध्ये मोठा फरक आहे. सहसा सेमिनार Off-line आयोजित केले जाते. जो की एखाद्या ठिकाणी आयोजित केलेला कार्यक्रम असतो.

यामध्ये आयोजक किंवा होस्ट आणि प्रेक्षक किंवा श्रोते हे दोघेही एकाच ठिकाणी उपस्थित असतात आणि संपूर्ण कार्यक्रम समोरासमोर पार पाडतो. यामध्ये सेमिनारसाठी उपस्थित असलेले लोकच ते ऐकू किंवा पाहू शकतात.

याउलट Webinar हे online आयोजित केले जाते, जे कोणत्याही स्थानापर्यंत मर्यादित नसते कारण ते internet वर प्रसारित केले जाते.

यामध्ये, Host हा internet, computer आणि software च्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून Webinar चे आयोजन करतो आणि प्रेक्षक किंवा श्रोतेही कुठेही राहून त्यात सहभागी होऊ शकतात.

Shop our Memorial Day Deals Now!

Tags : Webinar Meaning in marathi, what is Webinar in marathi language, Webinar mhanje kay, वेबिनार म्हणजे काय? webinar information in marathi, वेबिनार अर्थ मराठी

2 thoughts on “Webinar म्हणजे काय? What is Webinar Meaning in Marathi Language”

  1. Very good information about webinar and seminar on internet.It shows difference between webinar and seminar.
    Host is playing role in this. In both there is facility for question and answer.

    Reply

Leave a Comment